अहमदनगर - संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे सहा तर संगमनेरात एक अशा सात व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्याने संगमनेर पुन्हा हादरले आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी जिल्हाधिकारी राहुल दिवेद्वी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार यांनी संगमनेरसह धांदरफळ बुद्रूक येथे भेट देऊन पाहणी केली.
संगमनेर तालुक्यात एका दिवसात कोरोनाचे ७ पॉझिटिव्ह; जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी केली परिसराची पाहणी - अहमदनगरमध्ये कोरोनारुग्णांची संख्या
शनिवारी संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे सहा तर संगमनेरात एक अशा सात व्यक्ती कोरोनाबाधित आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी संगमनेरसह धांदरफळ बुद्रूक येथे भेट देऊन पाहणी केली.
संगमनेरचा जाहीर झालेला हॉटस्पॉट आणि धांदरफळ बुद्रूक प्रतिबंधात्मक क्षेत्र येथे आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याची तंबी जिल्हाधिकार्यांनी प्रशासकीय अधिकार्यांना दिली आहे. तालुक्यातील धादंरफळ येथील 67 वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित होऊन त्याचा मृत्यू झाल्याने झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यापाठोपाठ संगमनेरातील कुरण रोड येथील एक महिला तसेच धांदरफळ बुद्रूक येथील सहा व्यक्ती कोरोनाबाधित आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी संगमनेरसह धांदरफळ बुद्रूक येथे भेट दिली.
संगमनेरातील जाहीर केलेल्या हॉटस्पॉट परिसराची मॅपनुसार जिल्हाधिकार्यांनी पाहणी केली. त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकार्यांनी जारी केलेल्या आदेशाप्रमाणे कडक अंमलबजावणी करण्याची तंबी प्रशासकीय अधिकार्यांना दिली आहे.