अहमदनगर- ओल्या दुष्काळाने जिल्ह्यातील 65 हजार हेक्टर शेती बाधीत झाली आहे. पंचनाम्यासाठी कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची मदत घेणार असल्याची माहिती गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली आहे.
अवकाळी पावसाने 65 हजार हेक्टर क्षेत्र बाधीत, पंचनाम्यासाठी विद्यार्थ्यांची घेणार मदत- राधाकृष्ण विखे
जिल्ह्यात परतीच्या पावसाने चांगलीच बरसात केली असून हाता तोंडाशी आलेले पिक नष्ट झाल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही, असा दिलासा सोमवारी राधाकृष्ण विखेंनी दिला आहे.
जिल्ह्यात परतीच्या पावसाने चांगलीच बरसात केली असून हाता तोंडाशी आलेले पिक नष्ट झाल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही, असा दिलासा सोमवारी राधाकृष्ण विखेंनी दिला आहे. जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे बाधीत शेतीची पाहणी केल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेतले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना विखे पाटील यांनी शासकीय अधिकाऱ्यांना अनेक सूचना केल्या असल्याचे सांगीतले. तसेच शासन लवकरात लवकर मदत देईल, असा विश्वास देखील व्यक्त केला आहे.
जिल्ह्यात 65 हजार हेक्टर शेती क्षेत्र हे अतिवृष्टीमुळे बाधित झाले असून जवळपास 4 लाख 85 हजार शेतकरी अडचणीत आले आहेत. जिल्हाभर तलाठी, ग्रामसेवक हे बाधीत शेतीक्षेत्राचे पंचनामे करत असून हे काम लवकर पूर्ण व्हावे म्हणून जिल्ह्यातील कृषी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची मदत मागीतली आहे. त्यासाठी प्रशासनातर्फे विद्यापीठाला विनंती करण्यात आली आहे. पंचनाम्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार असल्याची माहितीही विखे यांनी यावेळी दिली आहे.