महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आवास योजनेतून 60 कुटुंबांना मिळाले हक्काचे घर - shirdi latest news

राहाता तालुक्यातील लोणी बुद्रूक येथे ६० कुटुंबीयांना त्यांचे वास्तव्य असलेल्या जागेवरच प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना आणि शबरी योजनेच्या माध्यमातून घर उपलब्ध करून देण्यात आलेत.

rahata
60 कुटुंबीयांना मिळाले हक्काचे घर

By

Published : Jun 15, 2021, 5:54 PM IST

Updated : Jun 15, 2021, 8:35 PM IST

शिर्डी - मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या शासकीय पडीक जमिनी घरकूल उभारणीसाठी उपयोगात आणल्या तर वंचित कुटुंबीयांना हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. याबाबत शासनाने धोरण घेण्याची गरज असल्याचे मत राधाकृष्ण विखे पाटील यानी व्यक्त केले.

प्रतिक्रिया देताना

राहाता तालुक्यातील लोणी बुद्रूक येथे ६० कुटुंबीयांना त्यांचे वास्तव्य असलेल्या जागेवरच प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना आणि शबरी योजनेच्या माध्यमातून घर उपलब्ध करून देण्यात आलीत. सिंधूताई आदिवासी निवारा या गृहप्रकल्पाचा लोकार्पण सोहळा विखे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपन्न झाला. माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, रहिवाशांना घराची उपस्थितांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

विखे पाटील म्हणाले की, अतिशय संघर्षमय परिस्थितीत ही सर्व कुटुंब या जागेत राहात होती. यांना घर मिळावीत मातोश्री सिंधूताईची खूप इच्छा होती. आज हे स्वप्न पूर्ण होत आहे याचे मोठे समाधान असल्याचे सांगून आमदार विखे पाटील म्हणाले की, विविध शासकीय विभागांच्या जागा मोठ्या प्रमाणात पडीक असतात. परंतू त्याचा विनियोग होत नाही. वर्षानुवर्षे या जागांवर अतिक्रमण तसेच राहिली आहेत. परंतू सामाजिक दृष्टिकोनातून विचार झाल्यास या जागांचा उपयोग आशा शासकीय घरकुल योजनांच्या उभारणीसाठी झाल्यास वंचित घटकांना त्यांच्या हक्काचे घर मिळवून देता येईल. या घरकुलांच्‍या बाबतीत असा निर्णय भाजप सरकारच्‍या काळात घेण्‍यात आला. राज्‍यातील हा पहि‍ला निर्णय ठरल्‍याने आहे त्‍याच जागेवर रहिवाश्‍यांना घर देण्‍याचा गृह प्रकल्‍प यशस्‍वी होवू शकला. भविष्‍यात ग्रामीण भागात अशा जागांसाठी निश्चित असे धोरण घेवून जर घरकुल योजनांसाठी जागा उपलब्‍ध करुन देण्‍याचा निर्णय घेतला तर त्‍याचा निश्चितच लाभ वंचित घटकांना होईल, अशी अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांनी आपल्या भाषणात या गृहप्रकल्पाच्या शासकीय स्तरावर झालेल्या पाठपुराव्याचा आढावा घेवून सांगितले की, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेला गृहप्रकल्प राज्यात आदर्श ठरला असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. जिल्‍हा परिषदेच्या माध्‍यमातून या प्रकल्‍पाचा पाठपुरावा करता आला. यामध्‍ये सातत्‍य राहिल्‍यानेच या प्रकल्‍पाला मूर्त स्‍वरुप येवू शकल्‍याचे त्‍यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक माजी उपसरपंच अनिल विखे यांनी केले. लोणी बुद्रूक ग्रामस्‍थांच्‍या वतीने विखे पाटील यांचा सत्‍कार करण्‍यात आला. सर्व मान्‍यवरांनी घरकुलांची पाहाणी करुन, अंगणवाडीच्‍या इमारतीचेही उद्घाटन आणि वृक्षारोपणही केले.

Last Updated : Jun 15, 2021, 8:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details