अहमदनगर - कोरोना विषाणूच्या निर्मुलनासाठी महाराष्ट्र शासनाच्या मदतीला अनेक हात पुढे येत आहेत. याच पार्श्वभूमीवर अहमदनगरमधील कोपरगाव तालुक्यातील सखुबाई जाधव या भाजी विक्रेत्या महिलेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत म्हणून 51 हजारांची दिले आहेत.
कौतुकास्पद! भाजी विक्रेत्या महिलेची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 51 हजारांची मदत - Jeur Patoda Ahmednagar
शिर्डीतील एका भाजी विक्रेत्या महिलेचे कौतुक करावे तितके कमीच आहे. या महिलेने स्वतः साठवलेले 51 हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत म्हणून दिले आहेत.
भाजी विक्रेत्या महिलेची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 51 हजाराची मदत
हेही वाचा.....तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना द्यावा लागणार राजीनामा
महाराष्ट्रातील आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता देणे हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे उद्दिष्ट आहे. कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा येथील रहिवाशी आणि भाजी विक्रेत्या सखुबाई जाधव यांनी आपल्या जमापुंजीतील 51 हजार रुपयांची राशी या मुख्यमंत्री सहायत्ता निधीसाठी दिली आहे. हा 51 हजार रुपयांचा धनादेश त्यांनी तहसीलदार योगेश चंद्रे यांच्याकडे सपुत्र केला आहे.