अहमदनगर :देशभरातून अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सांदण ही दरी पाहण्यासाठी पर्यटक येतात. ही आशिया खंडातीस दोन नंबरची खोल दरी आहे. रविवार दिनांक ४ रोजी दुपारी १ वाजेच्या दरम्यान अचानक आलेल्या वादळी वारा व मुसळधार पावसामुळे अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण परिसरातील सांदण दरीमध्ये अडकलेल्या सुमारे ५०० पर्यटक अडकले होते. स्थानिक नागरिक व गाईड यांच्या मदतीने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी अडकलेल्या पर्यटकांना सुखरुप बाहेर काढले.
अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस : शनिवार, रविवार सुट्टी होती. तसेच भंडारदरा धरण परिसरात सुरु असलेला काजवा महोत्सवचा आनंद उपभोगण्यासाठी सद्या मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. परिसरात जत्रेचे स्वरुप निर्माण झाले आहे. जिकडेतिकडे पर्यटकांच्या वाहनांची मोठ्या रांगा लागलेल्या पाहावयास मिळत आहे. यातील काही पर्यटक शनिवारी रात्री काजवा महोत्सवाचा मनमुराद आस्वाद घेवुन रविवारी दुपारी आशिया सांदण दरीचा आनंद घेण्यासाठी दरीमध्ये उतरले व अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली व पाण्याचा ओघ वाढू लागला.