महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहमदनगरच्या राक्षसवाडीत ५० वर्षीय महिलेवर अत्याचार; आरोपीच्या अटकेसाठी गाव बंद - राक्षसवाडी

आरोपी शिंगटे याने काही वर्षांपूर्वीही गावात छेडछाडीचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी त्याच्या विरोधात कठोर कारवाई न केल्यानेच आरोपीची मजल महिलेवर अत्याचार करण्यात गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

राक्षसवाडी खुर्द

By

Published : Jul 7, 2019, 10:56 AM IST

अहमदनगर - कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी खुर्द गावात एका ५० वर्षीय महिलेवर भरदिवसा अत्याचाराची घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आरोपी गोरख भागूजी शिंगटे हा महिलेवर अत्याचार करून फरार झाला आहे. त्याच्याविरोधात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राक्षसवाडी खुर्द

घटनेनंतर ग्रामस्थांनी 'चूल बंद' आंदोलन करून आरोपीच्या अटकेची मागणी केली आहे. आरोपी शिंगटे याने काही वर्षांपूर्वीही गावात छेडछाडीचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी त्याच्या विरोधात कठोर कारवाई न केल्यानेच आरोपीची मजल महिलेवर अत्याचार करण्यापर्यंत गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. राज्यात सर्वत्र चर्चा झालेली कोपर्डी निर्भया अत्याचार घटना याच कर्जत तालुक्यातील असून राक्षसवाडी गाव कोपर्डी पासून अवघ्या ५ किलोमीटरवर आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details