अहमदनगर - जिल्ह्यातील नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणात रविवारी झालेल्या यात्रेमुळे तब्बल ४ ते ५ टन कचरा साठला होता. सोमवारी शंकरराव गडाख मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या कचऱ्याची विल्हेवाट लावली. या स्वच्छता अभियानात चारशे ते पाचशे कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.
कामिका एकादशी निमित्ताने रविवारी नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणात मोठ्या प्रमाणात यात्रा भरल्याने मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. म्हणून मंदिर परिसरात शंकरराव गडाख मित्र मंडळाच्या वतीने सोमवारी दि. २९ जुलै रोजी सकाळी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.