महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिर्डी साईबाबा मंदिराशेजारी महिला सुरक्षा रक्षकांना आढळली ५ महिन्याची बेवारस मुलगी - Shirdi Saibaba temple

मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी श्री साईनाथ रुग्णालयात नेण्यात आले. मंदिर सुरक्षा विभागाकडुन  चिमुरडीला पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. तीची रवानगी नगर येथील चाईल्ड लाईन संस्थेत केली जाणार आहे. पाच महिन्यांच्या या चिमुरडीला कोणी व का टाकले तिचे पालक कोण ? याचा तपास शिर्डी पोलिस करत आहेत.

शिर्डी साईबाबा मंदिराशेजारी महिला सुरक्षा रक्षकांना आढळली ५ महिन्याची बेवारस मुलगी

By

Published : May 31, 2019, 11:36 PM IST

अहमदनगर -शिर्डी साईबाबा मंदिराशेजारी महिला सुरक्षा रक्षकांना आज सकाळी ६ च्या सुमारास पाच महिन्यांची मुलगी बेवारस टाकलेली आढळून आली. गर्दीचा फायदा घेऊन या चिमुरडीला अज्ञात व्यक्तीने गुरूस्थानजवळ टाकून दिल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. मंदिर सुरक्षा रक्षकांनी प्रयत्न करुनही मुलीला नेण्यास कोणीही आले नाही.

शिर्डी साईबाबा मंदिराशेजारी महिला सुरक्षा रक्षकांना आढळली ५ महिन्याची बेवारस मुलगी

त्यानंतर मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी श्री साईनाथ रुग्णालयात नेण्यात आले. मंदिर सुरक्षा विभागाकडुन चिमुरडीला पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. तीची रवानगी नगर येथील चाईल्ड लाईन संस्थेत केली जाणार आहे. पाच महिन्यांच्या या चिमुरडीला कोणी व का टाकले तिचे पालक कोण ? याचा तपास शिर्डी पोलिस करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details