अहमदनगर - कोतवाली पोलीस ठाण्यातील चार पोलिसांनी वाळू वाहतूक करणारा डंपर पकडल्यानंतर चालकाकडून पैसे घेऊन त्याला सोडून दिले होते. तसेच गांजा प्रकरणातील अटक केलेला आरोपीही पसार झाला होता. या दोन्हीं घटनांप्रकरणी चारही कोतवाली पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबित करण्यात आले आहे. प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी गुरूवारी रात्री ही कारवाई केली. प्रभाकर भांबरकर, राहुल खरात, राजेश जाधव, किरण बारवकर अशी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचार्यांची नावे आहेत.
अहमदनगरमधील 'त्या' दोन घटनांप्रकरणी चार पोलीस निलंबित - 4 police suspended ahemednagar
शहर पोलीस उपअधीक्षक संदिप मिटके यांच्या पथकाने बेकायदेशीर गांजा वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले होते. त्यातील एका आरोपीला जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
शहर पोलीस उपअधीक्षक संदिप मिटके यांच्या पथकाने बेकायदेशीर गांजा वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले होते. त्यातील एका आरोपीला जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पोलीस नाईक बारवकर यांच्या ताब्यातून हा आरोपी पसार झाला होता. तसेच अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर कोतवालीच्या प्रभाकर भांबरकर, राहुल खरात, राजेश जाधव यांनी पकडला होता. तो डंपर पैसे घेऊन सोडून दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या दोन्ही प्रकरणाची प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी गंभीर दखल घेतली. या दोन्ही प्रकरणात दोषी असलेल्या पोलीस कर्मचार्यांवर त्यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
हेही वाचा -पुतळ्यासाठी पैसे आहेत मात्र लोकांच्या आरोग्याचे काय? उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले