शिर्डी- संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर येथील गायकवाड वस्ती आणि जांभळीचा मळा येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. आज सकाळी सात ते आठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. कृष्णा वाल्मिक गायकवाड (वय 3) आणि संजय जगन भडांगे (वय ४०) अशी जखमींची नावे आहेत.
संगमनेरमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; 4 जण जखमी
संबंधित ठिकाणाची पाहणी करण्यासाठी आलेल्या दोन वन मजुरांवर त्याच बिबट्याने पुन्हा हल्ला केला आहे. यात संजय भुजबळ व एकनाथ शेटे हे वनमजूर जखमी झाले आहेत.
कृष्णा हा अंगणात खेळत असताना पाठीमागून आलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर तेथे असलेल्यांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला. त्यानंतर सुमारे पाचशे मीटर अंतरावर असलेल्या जांभळीचा मळा येथे याच बिबट्याने संजय भडांगे यांच्यावर हल्ला केला. जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
संबंधित ठिकाणाची पाहणी करण्यासाठी आलेल्या दोन वन मजुरांवर त्याच बिबट्याने पुन्हा हल्ला केला आहे. यात संजय भुजबळ व एकनाथ शेटे हे वनमजूर जखमी झाले आहेत.