महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संगमनेरमधील चौघांना कोरोनाची लागण; रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध सुरू - संगमनेर कोरोनाग्रस्त

संगमनेर येथील चौघांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. हे चौघे रुग्ण काही दिवसांपूर्वी एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

4 people from sangamner tested positive for covid 19
संगमनेरमधील चौघांना कोरोनाची लागण; रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध सुरू

By

Published : Apr 23, 2020, 4:43 PM IST

अहमदनगर - संगमनेर येथील चौघांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. हे चौघे रुग्ण काही दिवसांपूर्वी एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यांचा अहवाल प्राप्त झाला असून ते चोघेही कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.

चौघा रुग्णांना सर्दी, खोकल्याचा त्रास असल्याने एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यामुळे त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यात ते पॉझिटिव्ह निघाले. संगमनेर येथील चौघा पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील लोकांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details