अहमदनगर - जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील म्हसे खुर्द या गावाजवळ बडे-ढवळे वस्ती येथील एकाच कुटुंबातील ४ जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. यामध्ये दाम्पत्यासह दोन मुलांचा समावेश आहे. त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.
अहमदनगरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या, आई-वडिलांसह दोन मुलांचा समावेश हे वाचलं का? - अमरावतीत पतीने आत्महत्या केल्याचे समजताच पत्नीनेही संपवली जीवनयात्रा
बाबाजी विठ्ठल बडे (वय 40), कविता बाबाजी बडे (वय 35), आदित्य बाबाजी बडे (वय 15), धनंजय बाबाजी बडे (वय 13)असे मृतांची नावे आहेत. बडे कुटुंबीय दररोज सकाळी उठत असते. मात्र, आज सकाळी कोणीही दिसले नाही. त्यामुळे शेजाऱ्यांनी घरात डोकावून बघितले असता नवरा-बायको आणि दोन मुले एका पाईपला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यानंतर घटनेची माहिती पारनेर पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे.
हे वाचलं का? -नागपूरमध्ये तरुणाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या, भीशीचे पैसे परत करण्यात ठरला होता अपयशी