अहमदनगर - अहमदनगर - मनमाड महामार्गावरील राहुरी तालुक्यातील गुहा फाटा येथे भीषण अपघात झाला. या अपघातात मध्य प्रदेशमधील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघातात एक पुरुष, दोन महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.
हेही वाचा -Anna Hazare Ralegansiddhi : 'लोकायुक्त कायदा करा, अन्यथा सरकारमधून पायउतार व्हा'
रविवारी दुपारच्या सुमारास नगर सटाणा ही बस नगरहून शिर्डीकडे जात होती. तर, मध्य प्रदेशातील महिंद्रा गाडी क्र. एमपी 10 सीबी 1236 ही पुण्याकडे चालली असताना नगर - मनमाड राज्य महामार्गावर गुहा फाट्याजवळ दोन्ही वाहनांचा समोरासमोर भीषण अपघात झाला. अपघात इतका भयंकर होता की चारचाकी गाडी चक्काचूर झाली. या गाडीतील चार जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा -Rani Mukherjee Visit Sai Temple : राणी मुखर्जीने घेतले साईंबाबांचे दर्शन