अहमदनगर - औरंगाबाद महामार्गावरील कांगोणी फाट्याजवळ दुधाच्या टँकरला पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या चिंतामणी ट्रॅव्हलने जोरदार धडक दिली. या धडकेत ४ प्रवासी जागीच ठार झाले तर २४ जखमी झाले आहेत. ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. जखमींवर अहमदनगर येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
संजय रामकृष्ण सावळे (वय ४०, जि. बुलडाणा), आकाश सुरेश यांगड (वय २७, रा. खंडाळा ता. चिखली, जिल्हा – बुलडाणा), कल्पेश गुलाबराव व्यवहारे ( वय २२, रा. सारोखपीर ता. मौताळा, जि. बुलडाणा) असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
रॉयल चिंतामणी ट्रॅव्हल्सची बस पहाटेच्या सुमारास पुण्याकडे चालली होती. पहाटेच्या सुमारास पुढे चाललेल्या टँकरला ट्रॅव्हल्सने पाठीमागून जोरदार वेगाने धडक दिली. या अपघाताची माहिती शिंगणापूर पोलीस ठाण्याला मिळाली. तेव्हा पोलीस निरीक्षक ललीत पांडुळे यांच्यासह कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
जखमींची नावे -
ज्योती हिवराळे, ज्ञानेश निकाळजे, सुरज गलांडे, प्रेम निकाळजे, छाया सुरवाळे, भरत सावळे, करण सावळे, राजू यांगड, बेबी यांगड, पावतीबाई गवते, गोपाळा चंगड, विघेना झाडे, गोपाल यांगड, पदमाकर इंगळे (सर्व बुलडाणा), महेश बुधीवंत(वाशीम),विजय गव्हाणे (अमरावती), अनिता गव्हाणे (अमरावती), संतोष तुकाराम पुरकर ( ता. मुक्ताईनगर जि.जळगाव), स्वाती गणेश पाखरे ( पुणे), स्वाती महेश पठारे (पुणे), गजानन दत्तात्रय हिंगे, उषा गजानन हिंगे, अनिल परशुराम मोंडवे, रेखा अनिल मोंडवे