अहमदनगर- दिल्लीतील निजामुद्दीन येथे झालेल्रया तबलिगी मरकझ कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या तब्बल ४६ जणांमधील ३५ जणांना जिल्हा पोलीस प्रशासनाने शोधून काढले आहे. या सर्वांचे विलगीकरण करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी दिली आहे.
मरकझ : ३५ जणांना शोधण्यात अहमदनगर पोलिसांना यश; ११ जणांचा शोध सुरू
विलगीकरण केलेल्या ४६ व्यक्तींमध्ये २९ व्यक्ती या विदेशी आहेत, तर उर्वरित १७ भारतीय आहेत. १७ व्यक्तींमधील ६ सापडले असून उर्वरीत ११ जणांचा शोध सुरू आहे. २ विदेशी नागरिक कोरोना विषाणू बाधित आहे. त्यातील १२ जणांचे स्त्राव अहवाल निगेटिव्ह आले असून अजून १५ विदेशी नागरिकांचे स्त्राव अहवाल येणे बाकी आहे.
विलगीकरण केलेल्या ४६ व्यक्तींमध्ये २९ व्यक्ती या विदेशी आहेत, तर उर्वरित १७ भारतीय आहेत. १७ व्यक्तींमधील ६ सापडले असून उर्वरीत ११ जणांचा शोध सुरू आहे. दोन विदेशी नागरिक कोरोना विषाणू बाधित आहे. त्यातील १२ जणांचे स्त्राव अहवाल निगेटिव्ह आले असून अजून १५ विदेशी नागरिकांचे स्त्राव अहवाल येणे बाकी आहे. सध्या जिल्ह्यात एकूण ८ जण कोरोना बाधित असून यातील पहिला रुग्ण बरा झाल्याणे त्याला घरी सोडण्यात आले आहे.
हेह वाचा-कोरोनामुळे शाळा बंद.. पालकांना देण्यात आले पोषण आहाराचे तांदूळ व कडधान्य