अहमदनगर - साईबाबांच्या जन्मस्थळाच्या वादावरुन काल (रविवार) शिर्डी ग्रामस्थांनी बंद पुकारला होता. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिर्डी ग्रामस्थांना चर्चेसाठी मुंबईत आमंत्रित केल्याने आंदोलन मागे घेतले आहे. त्यामुळे शिर्डीतील सगळे व्यवहार आजपासून सुरळीत सुरु झाले. आज दुपारी २ वाजता शिर्डी ग्रामस्थांची मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा होणार आहे.
शिर्डी ग्रामस्थांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, दुपारी २ वाजता बैठक - साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद. न्यूज
साईबाबांच्या जन्मस्थळाच्या वादावरुन काल (रविवार) शिर्डी ग्रामस्थांनी बंद पुकारला होता. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिर्डी ग्रामस्थांना चर्चेसाठी मुंबईत आमंत्रीत केल्याने आंदोलन मागे घेतले आहे. त्यामुळे शिर्डीतील सगळे व्यवहार आजपासून सुरळीत सुरु झाले.
साईबाबांच्या जन्मस्थळाच्या वादावर आज दुपारी शिर्डीकर आणि मुख्यमंत्री यांची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी शिर्डीतील 30 जणांचे शिष्टमंडळ आज सकाळी मुंबईकडे रवाना झाले आहे. आज होणाऱ्या बैठकीत जर तोडगा निघाला नाही, तर पुन्हा शिर्डीकर शांत बसणार नाहीत. पुढच्या काळात यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामस्थ कैलास कोते यांनी दिली. मुख्यमंत्र्यांबरोबर होणाऱ्या बैठकीला शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राधाकृष्ण विखे-पाटील, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे उपस्थित राहणार आहेत.