अहमदनगर - नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव फाट्याजवळ भरधाव स्कॉर्पिओने उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये ३ जण जागीच ठार झाले, तर १ जण जखमी झाला आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
नगर-पुणे महामार्गावर भीषण अपघात; ३ जणांवर काळाचा घाला - अहमदनगर
स्कॉर्पिओने जातेगावफाट्याजवळ उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्यासह कर्मचारी दाखल झाले. तसेच पंचनामा करून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ओझायर तसनीय अख्तर अन्सारी (वय ३०), फैसल गुलाब रब्बाली अन्सारी (वय-२०), इरफान शयशोदोहा अन्सारी असे मृतांची नावे आहेत, तर अदनान निहाल अन्सारी (वय-२१) गंभीर जखमी झाले आहेत. सर्वजण धुळ्याचे रहिवासी आहेत. ते आज पहाटेच्या सुमारास स्कॉर्पिओने नगरकडे येत होते. दरम्यान स्कॉर्पिओने जातेगावफाट्याजवळ उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्यासह कर्मचारी दाखल झाले. तसेच पंचनामा करून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.