अहमदनगर -जामखेडच्या कुसडगावात एका ३२ वर्षाच्या महिलेसह तीन मुलींंचे मृतदेह विहिरीत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. रक्षाबंधनच्या पूर्व संध्येला हा प्रकार समोर आल्याने याबाबत विविध शंका उपस्थित होत आहेत.
तीन मुलींसह शेतात गेलेली महिला घरी परतलीच नाही. काल(रविवारी) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास या चौघींच्या चपला विहिरीवर दिसल्या. शोधाशोध केल्यानंतर या चौघांचे मृतदेह विहिरीत आढळून आले.
संबंधित घटनेची माहिती मिळताच जामखेड पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी चौघींचे मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. हा प्रकार अपघात आहे, की घातपात याबद्दल अद्याप अस्पष्टता कायम असून पोलीस अधिक तपास करत आहेत.