अहमदनगर -जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 27 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. काल २३३ कोरोना संशयितांचे नमुने तपासण्यात आले त्यात २०६ व्यक्तींचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले. नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये संगमनेर 11, पारनेर 4, अकोले 3, श्रीरामपूर 3, शेवगाव 5, अहमदनगर 1 समावेश आहे.
संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठार 1, पेमगिरी 1, पिंपळगाव कोंझिरा 3, खांडगाव 2, ढोलेवाडी 1, संगमनेर शहरातील रहेमतनगर येथे 1 तर विठ्ठलनगर येथे 2 रूग्ण आढळले. पारनेर तालुक्यातील सावरगाव 2, कर्जुले हर्या 1 आणि हंगा 1 गावात कोरोनाचे रूग्ण आढळले. अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा 1, काळेवाडी 1 आणि वीरगाव 1 येथे रूग्ण आढळले. श्रीरामपूर शहरात काझिबाबा रोड येथे 1 आणि वॉर्ड क्र. दोनमध्ये कोरोनाचे 2 रूग्ण आढळले. शेवगाव तालुक्यातील मुंगी 1 तर नींबे नांदूर येथे कोरोनाचे 4 रूग्ण आढळून आले. नगर शहरात मंगल गेट येथे एक कोरोनाबाधित आढळला. याशिवाय खासगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या 6 रुग्णांची नोंद एकूण रूग्ण संख्येत घेण्यात आली.