महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाशी लढा; संस्थात्मक विलगीकरण केलेल्या 23 रुग्णांना उपचारानंतर सोडले घरी

डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणार असल्याची भावना यावेळी रुग्णांनी व्यक्त केली. त्यासह नातेवाईकांनासुद्धा वैद्यकीय सूचनांचे पालन करण्यास प्रवृत्त करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Shirdi
साई धर्मशाळा

By

Published : Apr 19, 2020, 8:08 PM IST

अहमदनगर- राहाता तालुक्यातील कोल्हार, भगवतीपूर, लोणी बुद्रुक, लोणी खुर्द, दाढ बुद्रुक, पाथरे, हणमंतपूर व हसनापूर या परिसरातील 55 व्यक्तींना निघोज येथील श्री साईबाबा संस्थानच्या साई आश्रम (फेज-2) धर्मशाळेतील विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 23 रुग्णांना उपचारानंतर तंदुरुस्त झाल्यामुळे आज विलगीकरण कक्षातून घरी सोडण्यात आले आहे.

साई धर्मशाळा
विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आलेल्या नागरिकांची प्रशासनातर्फे नियमित वैद्यकीय तपासणी करण्यात येत होती. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय गायकवाड, राहाता ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. गोकुळ घोगरे व त्यांचे सहकारी आणि साईबाबा हॉस्पीटलच्या डॉ. नरोडे, डॉ. पितांबरे यांच्या पथकाने रुग्णांची दैनंदिन वैद्यकीय तपासणी करुन मार्गदर्शन केले. विलगीकरण कालावधीत या रुग्णांना साई प्रसादालयाचे प्रमुख थोरात यांच्या देखरेखीखाली दैनंदिन नाष्टा, चहा, दोन वेळचे भोजन देण्यात आले. परिसराची स्वच्छता आणि औषध फवारणी शिर्डी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली ठेवण्यात आली होती. गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभागांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विलगीकरण कक्षाशी संबधित सर्व व्यवस्था चोखपणे पार पाडली. साईबाबा विश्वस्त संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, उपविभागीय अधिकारी गोविंद शिदे, शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली या रुग्णांची संपूर्ण देखभाल करण्यात आली.विलगीकरण कक्षातून डिस्चार्ज मिळाल्यानतर रुग्णांना घरी सोडण्यात आले. यावेळी रुग्णांनी तहसीलदार कुंदन हिरे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून, प्रशासनाने त्यांची आपुलकीने काळजी घेतल्याबद्दल आणि दिलेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले. घरी जाताना, डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करू आणि घरातील सदस्यांना नातेवाईकांनासुद्धा वैद्यकीय सूचनांचे पालन करण्यास प्रवृत्त करणार असल्याची भावना यावेळी रुग्णांनी व्यक्त केली. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनातर्फे आवश्यक खबरदारी घेण्यात येत असून नागरिकांनी घाबरुन न जाता प्रशासनास सहकार्य करावे, जे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत, ते नागरिकांच्या हितासाठीच असल्याने सर्वांनी त्याचे पालन करण्याचे आवाहन प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी गोविंद शिंदे यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details