अहमदनगर - राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात आज (गुरूवारी) आणखी एक कोरोना बाधित रूग्ण असल्याचे आढळून आल्याची माहिती, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली. येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदीदेखील उपस्थित होते.
अहमदनगर जिल्ह्यात या अगोदरच दुबई प्रवास करून आलेला एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर हा दुसरा रुग्ण आढळून आला आहे. हा रुग्ण नेवासे तालुक्यातील आहे. हा रुग्ण दुबईहून प्रवास करून आला आहे. यापूर्वी बुधवारी मुंबईत आणि भिवंडीत एका रुग्णाची वाढ झाली. राज्यात एकूण रूग्णांची संख्या आता 49 झाली आहे.