अहमदनगर - कर्जत तालुक्यातील चिंचोली फाटा येथे चौफुल्यावर टेम्पो व टँकर यांच्यात झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून चौघे गंभीर जखमी आहेत. अपघातानंतर टँकर चालक फरार आहे.
अहमदनगर : टेम्पो-टँकर अपघातात दोन कामगार ठार, चार अत्यवस्थ - highway accidents
अहमदनगर - कर्जत तालुक्यातील चिंचोली फाटा येथे चौफुल्यावर टेम्पो व टँकर यांच्यात झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, चौघे गंभीर जखमी आहेत. अपघातानंतर टँकर चालक फरार आहे.
संबंधित घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली. संदीप दादाराव शेरकर व भिवाजी नागेंद्र जोंधळे अशी मृतांची नावे आहेत. कर्जत- मिरजगाव व श्रीगोंदा-माहिजळगाव रस्त्यावर कर्जतहून टेम्पोतून सहा कामगार सिमेंट देऊन मिरजगावकडे चालले होते. यावेळी माहिजळगाव कडे भरधाव निघालेल्या टँकरने या टेम्पोला चिंचोली फाटा चौफुल्यावर जोराची धडक दिली.
त्यानंतर टँकरचालक फरार झालाय. टेम्पोत पुढे बसलेले संदीप शेरकर व शिवाजी जोंधळे ते दोघे बाहेर फेकले गेले. टेम्पोखाली दबल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात विष्णू राम विणकर, नितीन राजाभाऊ हरगुडे, गोपाला अशोक पवार हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी कर्जत येथील जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.