अहमदनगर- शेततळ्यात आई आणि तिच्या दोन लहान मुलींचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील घुमरी येथे घडली आहे. अनिता शरद पांडुळे (३०) सोनाली (१०) आणि सायली (७) अशी मृतांची नावे आहेत.
अहमदनगर : शेततळ्यात बुडणाऱ्या दोन मुलींना वाचविताना आईचाही मृत्यू - drown death in Ahmednagar
शेततळ्यात जास्त पाणी होते. तसेच पोहता येत नसल्याने आईसह दोन मुलींचा तळ्यात बुडून मृत्यू झाला.

मृत
अनिता या मुलीसह कपडे धुण्यासाठी शेततळ्यावर गेल्या होत्या. यावेळी खेळत असताना सोनाली आणि सायली या दोघी अचानक पाय घसरून शेततळ्यात पडल्या. त्या बुडू लागल्या हे पाहून त्यांना वाचविण्यासाठी अनिता यांनीही शेततळ्यात उडी मारली. मात्र शेततळ्यात जास्त पाणी होते. तसेच त्यांना पोहता येत नसल्याने या तिघींचाही बुडून मृत्यू झाला. दोन मुलींसह त्यांच्या आईचाही मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.