महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहमदनगरमध्ये लष्करी बॉम्बमधून शिसे काढताना स्फोट, दोघांचा मृत्यू - nagar blast news

नगर जिल्ह्यातील के. के. रेंजमध्ये यापूर्वीही अनेकदा स्फोटाच्या घटना घडल्या आहेत. येथे लष्करी सराव करण्यात येतो. लष्करी सरावानंतर अनेक वेळा स्थानिक नागरिक भंगार गोळा करण्यासाठी के. के. रेंज भागात जात असतात.

निकामी बॉम्ब समजून हाताळताना स्फोट

By

Published : Jul 10, 2019, 12:57 PM IST

Updated : Jul 10, 2019, 5:55 PM IST

अहमदनगर- एमआयडीसी हद्दीत असणाऱ्या लष्कराच्या के. के. रेंज भागात मंगळवारी रात्रीच्या वेळी स्फोट होऊन दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लष्कराने वापरलेला बॉम्ब निकामी असल्याचे समजून या दोघांनी त्यातून शिसे काढण्याचा प्रयत्न केला असावा. मात्र, बॉम्ब जिवंत असल्याने त्याचा स्फोट झाला. अशी माहिती मिळत आहे.

अक्षय नवनाथ गायकवाड (वय १९) आणि संदीप भाऊसाहेब तिरवडे (वय ३२, राहणार खारे कर्जुने) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी अहमदनगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नगरच्या खारे कर्जुने गावाजवळ के. के. रेंज लष्करी सराव केंद्र आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास साधारण साडे अकरा वाजण्याच्या सुमारास अक्षय आणि संदीप भंगार गोळा करण्यासाठी गेले असावेत, असा अंदाज आहे. हा बॉम्ब स्फोट एवढा मोठा होता, की आवाज ऐकूण परिसरातील लोक आणि लष्करातील अधिकारी तत्काळ घटनास्थळी जमा झाले. तेव्हा हे दोन जण या ठिकाणी पडलेले दिसून आले. या घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

नगर जिल्ह्यातील के. के. रेंजमध्ये यापूर्वीही अनेकदा अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत. या ठिकाणी लष्करी सराव करण्यात येतो. लष्करी सरावानंतर अनेक वेळा स्थानिक नागरिक भंगार गोळा करण्यासाठी के. के. रेंज भागात जात असतात. हे दोघेही भंगार गोळा करण्यासाठी गेले असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्या दृष्टिकोनातून पोलिसांनी तपास सुरू केला असल्याचे पोलीस निरीक्षक बोरसे यांनी सांगितले.

Last Updated : Jul 10, 2019, 5:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details