अहमदनगर- शेवगाव तालुक्यातील हिंगणगावमध्ये एका प्रेमीयुगलाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. हे प्रेमीयुगल गुरुवारपासून फरार होते. मुलगी अज्ञान असल्याची माहिती पुढे येत असून मुलाचे नाव राजेंद्र परमेश्वर शिंदे (२४) असे आहे.
विहिरीत आढळला तरुण-तरुणीचा मृतदेह; प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याची शंका - Police
प्रेमीयुगलाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शेवगाव तालुक्यातील हिंगणगाव येथे घडली आहे. हे प्रेमीयुगल जोडपे गुरुवारपासून फरार होते. मुलगी अज्ञान असल्याची माहिती पुढे येत असून मुलाचे नाव राजेंद्र परमेश्वर शिंदे असे आहे.
शेवगाव पोलीस ठाण्यात शुक्रवारी ३ वाजेच्या सुमारास या दोघांची हरवल्याची तक्रार दाखल झाली होती. दरम्यान, रविवारी सायंकाळी विहिरीत २ मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे येथील शेतकऱ्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी शेवगाव पोलीस ठाण्याला याची माहिती कळवली.
रात्री उशिरा शेवगाव पोलीस उपविभागीय उपाअधीक्षक मंदार जवळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सोमवारी दुपारी दोन्ही मृतदेहांना बाहेर काढण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शेवगाव जिल्हा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. प्रथमदर्शनी प्रेमप्रकरणातून ही आत्महत्या झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.