अहमदनगर -आदिवासी बहुल असलेला अकोले तालुका आत्तापर्यंत करोनामुक्त होता. मात्र, मुंबईहून आलेल्या लोकांमुळे दोन दिवसात कोराणाचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे अकोलेकरांची भिती वाढली आहे.
अकोले तालुक्यात दोघांना कोरोनाची लागण - ahmednagar latest news
आदिवासी बहुल असलेला अकोले तालुका आत्तापर्यंत करोनामुक्त होता. मात्र, आज कोरोनाचे २ रुग्ण आढळले आहेत.
![अकोले तालुक्यात दोघांना कोरोनाची लागण 2 corona positive cases found in akole](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7342344-385-7342344-1590408787261.jpg)
अकोले तालुक्यातील लिंगदेव येथील शिक्षकाचा खासगी प्रयोग शाळेचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. नंतर जिल्हा रुग्णालयात त्याचा स्वब घेऊन तो तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. तो अहवालही आज पॉझिटिव्ह आला आहे. नोकरीसाठी मुंबईत असणारा अकोले तालुक्यातील ढोकरी येथील अभियंता शनिवारी अकोल्यात आला होता. त्याला त्रास जाणवू लागण्याने तो ग्रामीण रुग्णालयात गेला. त्यानंतर तपासणीसाठी त्याला नगर येथे पाठवण्यात आले. त्याचाही अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तालुक्यातील रुग्णाची संख्या आता दोन झाली आहे.