महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहमदनगरमध्ये एकाच दिवसात वाढले 18 नवे रुग्ण; एकूण रुग्णांचा आकडा 302 वर - अहमदनगर कोरोना रुग्ण संख्या

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून रविवारी एकाच दिवसात 18 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णाची संख्या 302 वर पोहोचली आहे. तर सध्या 45 रुग्ण सक्रिय आहेत. तसेच 245 जण उपचारानंतर कोरोनातून मुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

अहमदनगर कोरोना अपडेट
अहमदनगर कोरोना अपडेट

By

Published : Jun 22, 2020, 11:59 AM IST

अहमदनगर - जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून रविवारी एकाच दिवसात 18 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत एकाच दिवसात इतके रुग्ण पाहिल्यांदाच आढळले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णाची संख्या 302 वर पोहोचली आहे. तर सध्या 45 रुग्ण सक्रिय आहेत. तसेच 245 जण उपचारानंतर कोरोनातून मुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

नगर शहरातील 3 तर श्रीगोंदा तालुक्यातील 3, तोफखाना भागातील ६२ वर्षीय महिला, सिद्धार्थ नगर भागातील ३५ वर्षीय पुरुष आणि सावेडी उपनगरातील रासने नगर येथील ६२ वर्षीय पुरुष यांना कोरोनाची लागण झाली आहे. श्रीगोंदा शहरातील १८ वर्षीय युवक आणि ६५ वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाली आहे. तर श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील ३७ वर्षीय महिलाही कोरोनाबाधित आहे. हे सर्व जण कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आले होते.

शहरातील लोकसंख्येने सर्वात मोठे असलेल्या सावेडी उपनगरात आतापर्यंत एकही रुग्ण नव्हता. त्यामुळे सावेडी उपनगरातील व्यवहार सुरळीतपणे सुरू होते. मात्र, रविवारी रात्री आलेल्या अहवालामध्ये या भागातील एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळली आहे. त्यामुळे आता सावेडी उपनगरात निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details