महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नेवासा कारागृहातील 17 कैदांना कोरोनाची लागण, रुग्णालयात दाखल - corona breaking

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील कारागृहातील 17 कैद्यांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे समोर आले आहे. या सर्व कैदांना उपचारासाठी अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

कैदांना कोरोनाची लागण
कैदांना कोरोनाची लागण

By

Published : Jul 30, 2021, 3:17 PM IST

Updated : Jul 30, 2021, 3:33 PM IST

अहमदनगर -अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील कारागृहातील 17 कैद्यांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे समोर आले आहे. या सर्व कैदांना उपचारासाठी अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

नेवासा कारागृहातील 17 कैदांना कोरोनाची लागण, रुग्णालयात दाखल

70 आरोपींची केली कोरोना चाचणी

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील कारागृहात न्यायालयीन कोठडीतील 60 तर पोलीस कोठडीतील 10 आरोपी आहेत. येथील कारागृहात पाच बराकी असून त्याची क्षमता 25 आरोपींची आहे. या पाच बराकी क्षमतेपेक्षा जवळपास तिप्पट आरोपी ठेवले जात आहेत. शनिवार दिनांक 24 जुलै रोजी कारागृहातील काही आरोपींना त्रास जाणवू लागल्याने सर्व 70 आरोपींची कोरोनाचाचणी करण्यात आली. त्यातील 17 आरोपी कोरोनाबाधित आढळून आले. यामधील नेवासा पोलीस ठाण्यातील दहा, सोनई पोलीस ठाण्यातील सहा व शिंगणापूर पोलीस ठाण्यातील एका आरोपीचा समावेश आहे. या 17 कोरोनाबाधित आरोपींपैकी 15 जणांना अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले असून एकास नेवासा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. एक आरोपी पोलीस कोठडीत असल्याने त्यास वेगळ्या बराकमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती कारागृह प्रशासनाने दिली आहे.

मागील वर्षीही 22 आरोपी झाले होते बाधित

मागील वर्षी जून महिन्यातही 22 आरोपींना करोनाची लागण झाली होती. त्यावेळीही 47 आरोपींची चाचणी करण्यात आली होती. नेवासा येथील कारागृहाची क्षमता व दिवसेंदिवस वाढणारी आरोपींची संख्या याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे.

हेही वाचा -विरारमध्ये महिला मॅनेजरची माजी मॅनेजरने चाकूने भोसकून केली हत्या, महिला कॅशिअर जखमी

Last Updated : Jul 30, 2021, 3:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details