अहमदनगर - जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कोरोना रूग्ण संख्येत १६१ ने वाढ झाली आहे. यामध्ये जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅबमध्ये ९०, अँटीजेन चाचणीत २६ आणि खासगी प्रयोगशाळेत आढळून आलेल्या ४५ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १४५२ इतकी झाली आहे.
दरम्यान, आज १३३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या आता २ हजार ४१८ झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये 90 जण बाधित आढळून आले. यामध्ये, नेवासा ११, संगमनेर ५, श्रीगोंदा १०, कोपरगाव ७, पाथर्डी १०, अहमदनगर महापालिका ८, नगर ग्रामीण १, पारनेर १
बीड -१, अहमदनगर शहर ४, पोलीस हेड कॉर्टर २, चितळे रोड १, सारस नगर १, संगमनेर २४, साईनाथ चौक १, आश्वि बु, ३ चंद्रशेखर चौक १, कुरण रोड २, खंडोबा गल्ली ३, पावबाकी रोड २, तहसील कचेरी १, निमगाव पागा ३, शेडगाव ३, इस्लामपूरा १, इंदिरानगर ०१, घुले वाडी १, जॉर्वे ०१, पद्मानगर ०१
अकोले ०१- जांभाळे,
पाथर्डी ०१ ,श्रीगोंदा (०१), अशा रुग्णांचा समावेश आहे.