अहमदनगर - संगमनेर शहरातील 15 संशयितांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. हे 15 जण रविवारी नगरमध्ये पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णाच्या संपर्कात होते. या 15 जणांना नगरच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात येणार आहे. एकाच वेळी 15 जण संशयीत आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या 15 संशयीतांना ताब्यात घेऊन क्वारंनटाईन केले आहे. संशयित परिसर सील करण्याची शक्यता वर्तवली जातेय.
CORONA : नगरमध्ये १५ संशयितांना केले क्वारंटाईन - corona crisis
संगमनेर शहरातील 15 संशयितांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. हे 15 जण रविवारी नगरमध्ये पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णाच्या संपर्कात होते. या 15 जणांना नगरच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात येणार आहे.
संगमनेर तालुक्यातील 15 नागरिक कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आले होते. ही बाब समोर येताच आरोग्य यंत्रणेने तत्काळ या 15 संशयित रुग्णांना अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या सर्वांना सध्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. सर्व जामखेडमध्ये 10 दिवस मुक्कामी होते. ही माहिती मिळताच आरोग्य यंत्रणेने तातडीने या 15 जणांचा शोध घेतला. या 15 पैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचंही सांगितलं जात आहे. संबंधित 15 कोरोना संशयित रुग्णांना जिल्हा रूग्णालयात हलवण्यात आलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून संशयितांच्या कुटुंबीयांना देखील होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे. हे सर्व आणखी कुणाच्या संपर्कात आले त्याची माहितीही घेण्यात येत आहे. दरम्यान, हे संगमनेरमध्ये ज्या परिसरात वास्तव्यास होते तो परिसर सील करण्यात आला