महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sheeps Died - संगमनेरमध्ये थंडी आणि पावसाने 14 मेंढ्याचा बळी - संगमनेर - तालुका बातमी

संगमनेर तालुक्यातील (Sangamner District) नांदूर खंदरमाळ या परिसरात थंडी आणि पावसाने तब्बल 14 मेंढ्याचा बळी (14 Sheeps Died) घेतला आहे. तर काही मेंढ्या अत्याअवस्थ आहे. पशुवैद्यकीय आधिकारी आणि कामगार तलाठी घटनास्थळी पोहचून पंचनामा करत आहे.

Sheeps Died
Sheeps Died

By

Published : Dec 2, 2021, 3:16 PM IST

संगमनेर - तालुक्यातील (Sangamner District) नांदूर खंदरमाळ या परिसरात थंडी आणि पावसाने तब्बल 14 मेंढ्याचा (14 Sheeps Died) बळी घेतला आहे. तर काही मेंढ्या अत्याअवस्थ आहे. पशुवैद्यकीय आधिकारी आणि कामगार तलाठी घटनास्थळी पोहचून पंचनामा करत आहे. या परिसरात अनेंक शेतकऱ्यांचा शेळ्या आणि मेंढ्या मृत्यूमुखी पडल्या असून पंचनामे सुरू आहे. ही घटना आज पहाटे घडली असून त्यामुळे मेंढपाळांचे मोठे नुकसान झाले आहे.

थंडी आणि पावसाने 14 मेंढ्याचा बळी

संगमनेर तालुक्यातील खंदरमाळ परिसरात सतु रेवजी सोडनर, संदीप शंकर जांभुळकर, संजय लहाणू झिटे हे सर्व मांडवे बुद्रुक ते खंदरमाळ येथे राहतात. परिसरात मेंढ्या चारण्यासाठी आले आहेत. बुधवारी सायंकाळी मेंढ्या वाघुरीत कोंडल्या होत्या. पण रात्री सुरू असलेला अवकाळी पाऊस व कड्याची थंडी यामुळे या मेंढपाळांच्या 14 मेंढ्या मृत्यूमुखी पडल्या. सकाळी घटनेची माहिती समजताच नांदूर खंदरमाळ येथील पशुवैद्यकीय आधिकारी भास्कर कुटाळ, कामगार तलाठी युवराज जारवाल, गणेश सोणवने यांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि पाहणी केल्यानंतर मृत मेंढ्याचा पंचनामा सुरू केला. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्याही शेळ्या आणि मेंढ्या या अवकाळी पाऊस व थंडीने मृत्यूमुखी पडल्या आहेत. पंचनामे सुरू असल्याने अद्याप 14 मेंढ्या मृत्यूमुखी पडल्याचे समोर आले आहे. हा आकडा वाढूही शकत असल्याची माहिती पशुवैद्यकीय आधिकारी यांनी दिली आहे. या घटनेने मेंढपाळांचे मोठे नुकसान झाले आहे.
हेही वाचा -Urban Naxalism case : प्रा. आनंद तेलतुंबडे यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला; आईच्या सांत्वनाकरिता केला होता अर्ज

ABOUT THE AUTHOR

...view details