अहमदनगर - शिर्डी मतदारसंघात सकाळपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. अनेक उत्सही मतदरांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. मात्र, वृद्ध मतदारांनी निवांत वेळेत येऊन मतदान केले. अशाच १०० वर्षीय दोन आजीबाईंनीदेखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
१०० वर्षीय नणंद भावजयींनी बजावला मतदानाचा हक्क - 100 years old two women casted their vote in shirdi
श्रीमती पुंजाबाई कोतकर आणि श्रीमती द्रौपदाबाई गायकवाड या नणंद भावजयींनी एकमेकींना आधार देत मतदान केंद्र गाठले आणि मतदानाचा हक्क बजावला.
१०० वर्षीय नणंद भावजयींनी बजावला मतदानाचा हक्क
या मतदारसंघातील श्रीरामपुर तालुक्यातील चांदेगाव येथील १०० वर्षे वयाच्या उंबरठ्यावर असलेल्या श्रीमती पुंजाबाई कोतकर आणि श्रीमती द्रौपदाबाई गायकवाड या नणंद भावजयींनी एकमेकींना आधार देत मतदान केंद्र गाठले. आणि मतदानाचा हक्क बजावला.