अहमदनगर - जिल्ह्यामध्ये आतापर्यंत तीन कोरणा विषाणूच्या रुग्ण आढळले असून त्यांच्यावर आयसोलेशन कक्षामध्ये उपचार सुरू आहेत. त्यातील सर्वात अगोदर विषाणू बाधित असलेल्या रुग्णांचे स्त्राव नमुन्यांचा 14 दिवसानंतरचा अहवाल काल रात्री उशिरा मिळाला असून तो निगेटिव्ह आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
नगर जिल्ह्यातील पहिल्या कोरोना बाधिताचा अहवाल निगेटिव्ह, आज पुन्हा तपासणी होणार.. - corona news
जिल्ह्यामध्ये आतापर्यंत तीन कोरणा विषाणू बाधित रुग्ण आढळले असून त्यांच्यावर आयसोलेशन कक्षामध्ये उपचार सुरू आहेत.
आज शनिवारी पुन्हा सकाळी स्त्राव नमुने घेतले जाणार असून त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर या रुग्णाला घरी सोडण्यात येईल. मात्र त्यानंतरही पुढील चौथा दिवस संबंधित रुग्णाला होम क्वारंटाईनईन रहावे लागणार आहे. 14 दिवसानंतर निगेटिव्ह आलेला रुग्ण दुबई प्रवास करून आला होता. या रुग्णाला मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तपासणीमध्ये कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं समोर आलं होतं.
त्यानंतर जिल्ह्यातील नेवासे आणि नगर शहरातील अजून दोन रुग्ण असे एकूण तीन रुग्ण विषाणू बाधित होते. त्यांच्यावर बूथ रुग्णालयाच्या आयसोलेशन कक्षात उपचार सुरू होते. आता यातील पहिल्यांदा दाखल झालेल्या कोरोनाबाधित संशयित रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आल्याने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी तसेच आरोग्य विभागाने समाधान व्यक्त केले आहे. तसेच इतर दोन रुग्णांची तब्येत व्यवस्थित असल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.