अहमदनगर -महाराष्ट्रात बंदी असणाऱ्या रॉयल चॉईस कंपनीच्या दारुच्या बॉक्सची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. हा टेम्पो गोव्यावरुन - गुजरातकडे चालला होता. या कारवाईदरम्यान दारूसह सुमारे एक कोटीचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे.
एकूण ९४ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
गोवा राज्यातून - गुजरातकडे रॉयल चॉईस कंपनीच्या दारुच्या बाटल्यांचे बॉक्स घेऊन आयशर टेम्पो जात असल्याची माहिती, श्रीरामपुर दारु उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार दुपारच्या सुमारास राहाता तालुक्यातील बाभळेश्वर चौकात पोलिसांनी नाकेबंदी केली. त्यानंतर एम. एच. 18 बी. जी. 5274 क्रमांक असलेला आयशर कंपनीचा सहा चाकी टेम्पो अडवला. या टेम्पोची झडती घेतली असता टेम्पोत रॉयल ब्लु व्हिस्कीच्या 180 मि. ली.च्या 57 हजार 600 बाटल्या असलेले 1200 बॉक्स मिळून आले. ज्याची किंमत 74 लाख 88 हजार रूपये आहे. ही दारू वाहतूक करणारा 20 लाख रूपयांचा आयशर कंपनीचा सहा चाकी टेम्पो जप्त करण्यात आला आहे. या कारवाईदम्यान एकूण ९४ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.