महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संगमनेर तालुक्यातील आदिवासी कुटुंबीयांसाठी 1 कोटी 12 लाख 84 हजार खावटी अनुदान मंजूर - 1 कोटी 12 लाख 84 हजार खावटी अनुदाना बद्दल बातमी

संगमनेर तालुक्यातील आदिवासी कुटुंबीयांसाठी 1 कोटी 12 लाख 84 हजार खावटी अनुदान मंजूर झाले आहे. या खावटी अनुदान अंतर्गत अनुसूचित जमातीच्या कुटुंबीयांना प्रति कुटुंब चार हजार रुपये इतक्या रकमेचा लाभ होणार आहे.

1 crore 12 lakh 84 thousand khawti grant sanctioned for tribal families in Sangamner taluka
संगमनेर तालुक्यातील आदिवासी कुटुंबीयांसाठी 1 कोटी 12 लाख 84 हजार खावटी अनुदान मंजूर....

By

Published : Apr 6, 2021, 7:35 PM IST

अहमदनगर - संगमनेर तालुक्यातील 2821 आदिवासी कुटुंबीयांसाठी 1 कोटी 12 लाख 84 हजार रुपये खावटी अनुदान मंजूर झाले आहे. ते या आदिवासी बांधवांच्या खात्यावर लवकरच वर्ग होणार असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा आहे. यातील प्रत्येक वाडी-वस्तीवर विकासाच्या योजना राबवताना बाळासाहेब थोरात यांनी योग्य व पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. यशोधन कार्यालयाच्या वतीने 18 पंचायत समिती गणांमध्ये 18 जनसेवक कार्यरत असून ते विविध गावांमधील वाडी-वस्ती गोरगरिबांच्या घरी जाऊन त्यांचे विविध दाखले, रेशन कार्ड, शासकीय योजना मिळवून देण्याचे काम सातत्याने करत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉग डाऊन मुळे कामे बंद असल्याने अनुसूचित जमातीच्या कुटुंबांसमोर बेरोजगारीचा प्रश्‍न निर्माण झाला होता. यामुळे महा विकास आघाडी सरकारने खावटी अनुदान योजना 2020 मध्ये सुरू केली. त्यातून 2020-21 करता ही अनुदान योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. या खावटी अनुदान अंतर्गत अनुसूचित जमातीच्या कुटुंबीयांना प्रति कुटुंब चार हजार रुपये इतक्या रकमेचा लाभ होणार आहे. यामध्ये दोन हजार रुपये रोख स्वरूपात आदिवासी बांधवाच्या खात्यावर वर्ग होणार आहेत. दोन हजार रुपयांचा खाद्य वस्तूंच्या स्वरूपात लाभ देण्यात येणार आहे. जवळपास तालुक्यातील 2821 लाभार्थींना एक कोटी 12 लाख 84 हजार रुपये अनुदान मंजूर केले असून ते लवकरच या लाभार्थींच्या बँक खात्यावर वर्ग होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details