महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सराफ लुटमार प्रकरणी आरोपी अटकेत, घटनेत एकाचा झाला होता मृत्यू - gold smith

बुधवारी संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास टोळक्याने घुलेवाडीत सराफा दुकानात लुटमार केली. तेव्हा सुवर्णकाराच्या मदतीसाठी गेलेल्या अविनाश शर्मा या दुचाकीस्वारावर या आरोपींनी गोळ्या झाडल्या होत्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला, तर साई कृपा ज्वेलर्सचे मालक ज्ञानेश्वर चिंतामणी हे गंभीर जखमी झाले होते.

sarafa
सराफा लुटमार प्रकरणी आरोपी अटकेत

By

Published : Feb 9, 2020, 8:34 PM IST

अहमदनगर - सराफवर गोळीबार करून लाखो रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना संगमनेरमध्ये बुधवारी घडली होती. याप्रकरणी एलसीबी पोलिसांनी रविवारी गणेश गायकवाड या आरोपीला अटक केली. या घटनेत एकाला आपले प्राण गमवावे लागले होते.

हेही वाचा - 'जास्त नाटकं कराल तर दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिलं जाईल'

बुधवारी संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास टोळक्याने घुलेवाडीत सराफा दुकानात लुटमार केली. तेव्हा सुवर्णकाराच्या मदतीसाठी गेलेल्या अविनाश शर्मा या दुचाकीस्वारावर या आरोपींनी गोळ्या झाडल्या होत्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला, तर साई कृपा ज्वेलर्सचे मालक ज्ञानेश्वर चिंतामणी हे गंभीर जखमी झाले होते. चिंतामणी यांच्याकडील चांदी असलेली पिशवी घेऊन ही टोळी नाशिकच्या दिशेने पळून गेली होते.

हेही वाचा - सूर्यमुखींनी लवकर उठावे.. अजित पवारांच्या जितेंद्र आव्हाडांना कानपिचक्या

या प्रकरणात दिपक विनायक कोळेकर (रा. सिडको, नाशिक), भरत विष्णु पाटील (रा. पंचवटी, नाशिक), निलेश, समाधान कुंडलिक गोडसे (रा. पुणे), अविनाश जगन्नाथ मारके (रा. घुलवाडी, संगमनेर) सहआरोपी आहेत. त्यांच्या शोध पोलीस घेत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details