महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Tokyo Olympics : तिरंदाज दीपिका कुमारीचे पदक मिळवण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल - archer deepika kumari

भारताची अव्वल महिला तिरंदाज दीपिका कुमारीची टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या महिला एकेरीत शानदार कामगिरी कायम आहे.

tokyo olympics : archer-deepika-kumar-beat-usa-jennifer-muccino-fernandez-6-4
tokyo olympics : दीपिका कुमारी पदकापासून एक पाऊल दूर

By

Published : Jul 28, 2021, 3:24 PM IST

Updated : Jul 30, 2021, 8:53 AM IST

टोकियो - भारताची अव्वल महिला तिरंदाज दीपिका कुमारीची टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या महिला एकेरीत शानदार कामगिरी कायम आहे. तिने अंतिम 16 मध्ये प्रवेश केला आहे.

दीपिकाने पहिला सामना सहज जिंकला. दीपिकाने भूटानच्या कर्माचा 6-0 असा सहज पराभव करत राउंड ऑफ 32 मध्ये प्रवेश केला होता. दीपिकाने नवख्या भूटानच्या कर्मावर संपूर्ण वर्चस्व राखले. तिने कर्माला एकही सेट जिंकू दिला नाही.

राउंड 32 मध्ये दीपिकाचा सामना अमेरिकेच्या जेनिफर फर्नाडेज हिच्याशी झाला. या सामन्यातील पहिला सेट दीपिकाने गमावला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये शानदार वापसी करत बरोबरी साधली. अखेरीस दीपिकाने हा सामना 6-4 असा जिंकत अंतिम 8 मध्ये प्रवेश केला.

तिरंदाजीत दीपिका, अतनुकडून पदकाच्या आशा -

आज सकाळी तिरंदाजीत तिसरा ऑलिम्पिक खेळत असलेला 37 वर्षीय तरुणदीप राय याचा इज्राइलचा खेळाडू इताय शैनी याने शूट ऑफमध्ये पराभव केला. यानंतर महाराष्ट्राचा तिरंदाज प्रविण जाधवचे आव्हान अंतिम 16 मध्ये संपुष्टात आले. आता भारताची मदार दीपिका कुमारी आणि अतनु दास यांच्यावर आहे. दीपिका आणि अतनु यांच्याकडून पदकाची आशा आहे.

हेही वाचा -मनिका बत्राला ऑलिम्पिकमधील 'ती' चूक महागात पडणार, टेबल टेनिस संघ कारवाईच्या तयारीत

हेही वाचा -Tokyo Olympics: मराठमोळा तिरंदाज प्रविण जाधव हरला; पण लढला

Last Updated : Jul 30, 2021, 8:53 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details