टोकियो - टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाचा ग्रेट ब्रिटनकडून पराभव झाला. ब्रिटनने भारतीय संघाचा ४-३ असा पराभव करत कास्य पदकावर नाव कोरले. भारतीय संघाचे या पराभवानंतर ऑलिम्पिकमध्ये पदकाचे स्वप्न अधुरे राहिले. यामुळे भारतीय खेळाडूंना मैदानावर अश्रू रोखता आले नाहीत. गोलकिपर सविता पुनिया, वंदना कटारिया, कर्णधार राणी रामपाल आणि नेहा गोयल यांच्यासमवेत संघातील सर्व खेळाडू भावूक झाले होते. याच पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला हॉकी संघाला फोन करून धीर देण्याचा प्रयत्न केला.
मोदी भारतीय महिला संघाला बोलताना म्हणाले की, "तुम्ही चांगला खेळ केलात. चिंता करू नका, देशाला तुमचा गर्व आहे. तुम्ही घेतलेली मेहनत देशातील मुलींसाठी प्रेरणादायी आहे."
मोदी यांच्याशी फोनवर बोलताना महिला खेळाडूंना अश्रू अनावर झाले. त्यावर मोदींनी त्यांना, तुम्ही रडू नका, असे सांगत धीर दिला. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पराभवामुळे निराश झालेल्या महिला हॉकी संघाला प्रोत्साहन देण्यासाठी मोदींनी ट्वीट देखील केलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विट