टोकियो - भारतीय पुरूष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला. भारताने 41 वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलं. जर्मनीचा 5-4 ने पराभव करत भारताने कास्य पदकाची कमाई केली. हा विजय संपूर्ण देशवासियांसाठी आनंद देणारा ठरला. आज आम्ही तुम्हाला इतिहास रचणाऱ्या भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूविषयी सांगणार आहोत.
- मनप्रीत सिंग - इतिहास रचणाऱ्या भारतीय संघाचा मनप्रीत कर्णधार आहे. मनप्रीतने 19व्या वर्षी भारतीय संघात डेब्यू केला.
- पी. आर. श्रीजेश - भारताचा सर्वात अनुभवी खेळाडू श्रीजेश आहे. गोलकिपर श्रीजेशने ऑलिम्पिकमध्ये डझनभर गोल अडवले आहेत. त्याने 206 मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व देखील केलं आहे. 2006 मध्ये त्याने डेब्यू केला होता.
- हरमनप्रीत सिंग - 2016 ज्यूनियर विश्व कप जिंकणारा हरमनप्रीत रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाचा सदस्य होता. जर्मनी विरुद्धच्या सामन्यात हरमनप्रीत सिंगने गोल केला. हरमनप्रीतला पेनल्टी कॉर्नरचा बादशाह मानलं जातं.
- सिमरनजीत सिंग - जर्मनीविरुद्धच्या सामन्यात सिमरनजीत सिंगने 2 गोल करत भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले. त्याने अनेक सामन्यात मोक्याच्या क्षणी गोल करत संघाला विजय मिळवून दिला आहे.
- रुपिंदर पाल सिंग - 31 वर्षीय डिफेंडर रुपिंदर पाल सिंगला ड्रॅग फ्लिकर म्हणून देखील ओळखलं जातं. टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्याने पेनल्टी कॉर्नरदरम्यान, भारतासाठी अनेक गोल केले. रुपिंदर 2018 पासून भारतीय संघाचा सदस्य आहे.
- सुरेंद्र कुमार - हॉकी इंडिया लीगमध्ये दिल्लीकडून खेळणाऱ्या सुरेंद्रने भारतीय संघात एन्ट्री झाल्यानंतर धम्माल केली. तो आशियाई स्पर्धा, रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळला आहे. सुरेंद्र कुमार भारतीय बचावफळीचा कणा मानला जातो.
- अमित रोहिदास - 2013 मध्ये अमित रोहिदास याने भारतीय संघात डेब्यू केला. तो डिफेन्सवर मोर्चा सांभाळतो.
- बिरेंदर लाकरा - 200 हून अधिक सामने बिरेंदरने खेळले आहेत. त्याचे हे दुसरे ऑलिम्पिक आहे. तो मिड फिल्डर पोझिशनवर खेळतो.
- हार्दिक सिंग - 22 वर्षीय युवा हार्दिकने टोकियो ऑलिम्पिकमध्ये नाव कमावलं. त्याने उपांत्य सामन्यात गोल केला होता. हार्दिक भारताचा प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे.
- विवेक सिंह प्रसाद - भारतीय संघाचा हा टॅलेंटेड मिड फिल्डर आहे. 2018 मध्ये 17वर्षांचा असताना विवेकने टीम इंडियात डेब्यू केला. त्याने टोकियोत फॉरवर्ड लाईनची जबाबदारी चोख पार पाडली.
- नीलकंठ शर्मा - मूळचा मणिपूरचा असलेला नीलकंठने मिड फिल्डर म्हणून भारतीय संघात स्थान मिळवलं आहे.
- सुमित वाल्मिकी - सुमितने खूप संघर्ष करत हॉकीमध्ये करियर निर्माण केलं आगे. तो त्याच्या वेगवान खेळामुळे प्रचलित आहे.
- शमशेर सिंग - ऑलिम्पिक संघात जेव्हा शमशेर सिंगचा समावेश करण्यात आला तेव्हा त्याची खूप चर्चा झाली होती. कारण शमशेरने फक्त 10 आंतरराष्ट्रीय सामने खेळली आहेत. तो एक टीम इंडियाचा सरप्राइज पॅकेज आहे.
- दिलप्रीत सिंग - पंजाबचा दिलप्रीत सिंगने 2018 मध्ये भारतीय संघात प्रवेश केला. त्याने अनेक स्पर्धामध्ये चांगली कामगिरी करत आपली छाप सोडली आहे.
- गुरजंत सिंग - ज्यूनियर विश्व कपमध्ये चांगली कामगिरी करत गुरजंत सिंगने भारतीय संघात स्थान मिळवलं. त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये मोक्याच्या क्षणी गोल करत भारताला पदकाच्या जवळ पोहोचवलं.
- मनदीप सिंग - 26 वर्षीय मनदीप सिंग फॉरवर्ड पोझिशनचा तगडा खेळाडू आहे. त्याने 2012 मध्ये डेब्यू केला. आतापर्तंत 150 हून अधिक सामने त्याने खेळली आहेत.