टोकियो - ग्रेट ब्रिटनने टोकियो ऑलिम्पिकच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या तासात तीन सुवर्ण पदके जिंकली. यातील डायव्हिंग खेळाडूने जगाचे लक्ष्य वेधलं आहे. या क्रीडा प्रकारात ग्रेट ब्रिटनचा टॉम डाले याने सुवर्ण पदक जिंकले. पदक जिंकल्यानंतर टॉम याने तो गे असल्याची कबुली दिली. दरम्यान, डायव्हिंग हा जलतरणामधील एक प्रकार आहे.
ऑलिम्पिक चॅम्पियन टॉम डाले म्हणाला, "जेव्हा मी लहान होतो. तेव्हा लोकांच्या गर्दीत देखील स्वत:ला एकटाच असल्याचे फील करत होतो. मी स्वत:ला सोसायटीमध्ये फिट समजत नव्हतो. पण आता मी अभिमानाने सांगू शकतो की, मी गे आहे आणि ऑलिम्पिक चॅम्पियन देखील आहे."
सुवर्ण पदक विजेता टॉम डाले पुढे म्हणाला की, "माझी सुवर्ण कामगिरी दुसऱ्या एलजीबीटी लोकांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा देईल. त्यांनी जर ठरवलं ते काहीही करू शकतील. मला आशा आहे की, एलजीबीटीमधील युवांना माझ्या यशाने नवा जोश मिळाला आहे. त्यांची विचारधारा बदलली. ते काहीही करु शकतात, हा विश्वास त्यांच्यात आला."