महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पथक अवतरताच पंतप्रधानांनी केले स्वागत - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले.

टोकियो ऑलिम्पिकचे उद्धाटन झाले असून जगभरातील संघांची पथके मैदानात उतरताना दिसली. यात भारतीय ऑलंपिक संघाचे नेतृत्व मेरी कोम आणि भारतीय पुरूष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग यांनी केले. जेव्हा तिरंग्यासह भारतीय पथक मैदानात अवतरले तेव्हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले.

Indian team at the Tokyo Olympics
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पथक

By

Published : Jul 23, 2021, 8:48 PM IST

टोकियो - टोकियो ऑलिम्पिकचा उद्धाटन सोहळा सुरू असून जगभरातून आलेल्या खेळाडूंनी आपल्या संघासह मैदानात हजेरी लावली. भारतीय संघाच्या पथकाचे नेतृत्व मेरी कोम आणि भारतीय पुरूष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग यांनी केले. जेव्हा तिरंग्यासह भारतीय पथक मैदानात अवतरले तेव्हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑलंपिक उद्घाटन सोहळ्यात भारतीय संघ अवतरला त्याची एक झलक आपल्या ट्विटरवर शेअर केली आहे.

उद्धाटन सोहळ्यात ग्रीसने आपल्या राष्ट्रीय ध्वजासह ऑलिम्पिक स्टेडियमध्ये प्रवेश केला. त्यानंतर क्रमाक्रमाने इतर देशाच्या संघानी प्रवेश करत आहेत. पहिल्या दहा क्रमात युएईचा संघ आला. तर ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेया, युक्रेन आणि उरुग्वे त्यानंतर आले. आयोजक समितीने वर्णमालेच्या क्रमानुसार याची निवड केली आहे. भारतीय संघ 21व्या स्थानावर आला. दरम्यान, जपानचे सम्राट नारूहितो यांच्यासोबत आयओसीचे प्रमुख थॉमस बाक हे देखील या उद्धाटन सोहळ्याला उपस्थित आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details