नवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद (ramnath kovind) यांनी आज राष्ट्रपती भवन (rashtrapati bhavan) येथे आयोजित विशेष सोहळ्यात 2021 या वर्षाच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे (KHEL RATNA AWARD) वितरण केले. युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने (Ministryof Youth Affairs AndSports) 2 नोव्हेंबर 2021 रोजी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर केले होते. क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दिले जातात. मागील चार वर्षे क्रीडा क्षेत्रात दिमाखदार आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या क्रीडापटूला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार (major dhyan chand award) दिला जातो.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत गोल्ड मेडल विजेता नीरज चोप्रा (Neeraj Chopra), क्रिकेटपटू मिताली राज, सुनिल क्षेत्री, ममप्रीत सिंह यांच्यासह 12 जणांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यावेळी एकूण 35 अर्जुन पुरस्कार, 10 द्रोणाचार्य पुरस्कार आणि 5 जीवनगौरव पुरस्कार देण्यात आले. क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना दरवर्षी राष्ट्रीय खेळ पुरस्कारांने सन्मानित केलं जातं.
मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार 2021
मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार (Major Dhyan Chand Khel Ratna Award 2021)12 जणांना मिळाला आहे. यात नीरज चोप्रा (अॅथलेटिक्स), रवी कुमार दहिया (कुस्ती), लवलीना बोरगोहेन (बॉक्सिंग), पीआर श्रीजेश (हॉकी), अवनी लेखारा (पॅरा शूटिंग), सुमित अंतिल (पॅरा अॅथलेटिक्स), प्रमोद भगत (पॅरा बैडमिंटन), कृष्णा नागर (पॅरा बैडमिंटन), मनीष नरवाल (पॅरा शूटिंग), मिताली राज (क्रिकेट), सुनील छेत्री (फुटबॉल), मनप्रीत सिंह (हॉकी) यांचा समावेश आहे.
नेत्रदीपक कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार 2021
अरपिंदर सिंह (अॅथलेटिक्स), सिमरनजीत कौर (बॉक्सिंग), शिखर धवन (क्रिकेट), सीए भवानी देवी (तलवारबाजी), मोनिका (हॉकी), वंदना कटारिया (हॉकी), संदीप नरवाल (कबड्डी), हिमानी उत्तम परब (मल्लखांब), अभिषेक वर्मा (नेमबाजी), अंकिता रैना (टेनिस), दीपक पूनिया (कुस्ती), दिलप्रीत सिंह (हॉकी), हरमनप्रीत सिंह (हॉकी), रूपिंदर पाल सिंह (हॉकी), सुरेंद्र कुमार (हॉकी), अमित रोहिदास (हॉकी), विरेंद्र लाकड़ा (हॉकी), सुमित (हॉकी), नीलकांत शर्मा (हॉकी), हार्दिक सिंह (हॉकी), विवेक सागर प्रसाद (हॉकी), गुरजंत सिंह (हॉकी), मनदीप सिंह (हॉकी), शमशेर सिंह (हॉकी), ललित कुमार उपाध्याय (हॉकी), वरुण कुमार (हॉकी), सिमरनजीत सिंह (हॉकी), योगेश कथूनिया (पैरा अॅथलेटिक्स), निषाद कुमार (पॅरा अॅथलेटिक्स), प्रवीण कुमार (पॅरा अॅथलेटिक्स), सुहाश यतिराज (पॅरा बॅडमिंटन), सिंहराज अधाना (पॅरा नेमबाजी), भावना पटेल (पॅरा टेबल टेनिस), हरविंदर सिंह (पॅरा तिरंदाजी) आणि शरद कुमार (पॅरा अॅथलेटिक्स).
द्रोणाचार्य पुरस्कार -