टोकिया- हा अविश्वसनीय अनुभव आहे, अशी प्रतिक्रिया ऍथलेटिक्समध्ये देशाला पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून देण्याची ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या नीरज चोप्राने प्रतिक्रिया दिली आहे. कामगिरीकरिता आत्मविश्वास असूनही पदक मिळविण्याची खात्री नव्हती, असा दावाही चोप्राने केला आहे.
भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने ऐतिहासिक कामगिरी करताना अॅथलेटिक्समधील भारताचा पदकाचा दुष्काळ संपवला. भालाफेकच्या अंतिम फेरीत त्याने सुवर्ण पदक जिंकले. त्याने पहिल्या व दुसऱ्या प्रयत्नातच एवढ्या लांब भाला फेकला की प्रतिस्पर्धींनी सुवर्णपदकाची अपेक्षाच सोडली. दरम्यान, अॅथलेटिक्स प्रकारात भारतीय खेळाडूने जिंकलेले हे पहिलं पदक आहे. याआधी अशी कामगिरी कोणत्याही भारतीय अॅथलीटला करता आलेली नाही. तसेच २००८ ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्रा याने नेमबाजीत सुवर्ण पदक जिंकलं होते. यानंतर ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी वैयक्तिक गटात सुवर्णपदक जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय ठरला.
हेही वाचा-Tokyo Olympics: नीरज चोप्राने सुवर्ण जिंकत दिवंगत मिल्खा सिंगची शेवटची इच्छा पूर्ण केली