हरिद्वार -विजयानंतरचा जल्लोष तर तुम्ही अनेकदा पाहिला असेल. पण पराभूत होऊन देखील सर्वांचं मन जिंकण्याचा पराक्रम भारतीय महिला हॉकी संघाने केला. भारतीय महिला हॉकी संघाची खेळाडू वंदना कटारिया आज तिच्या हरिद्वार येथील घरी पोहोचली. तिचे यावेळी जोरदार स्वागत करण्यात आले. या दरम्यान वंदना कटारिया भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. तिने खूप संघर्ष करत हे यश मिळवलं आहे. याविषयी तिनं सांगितलं की, आम्ही बहिणी शूट एकमेकांना शेअर करत हॉकी खेळत होतो.
वंदना कटारियाने सांगितलं की, तिच्या एक जोड शूट देखील खरेदी करण्यासाठी पैसै नव्हते. वंदना कटारियाने तिच्या वडिलांची आठवण करताना सांगितलं की, आज ते हयात नाहीत. मी त्यांचे अखेरचे दर्शन सुद्धा घेऊ शकले नाही.
वंदाना कटारियाने पुढे म्हणाली की, जेव्हा ती टोकियोहून परत येत होती. तेव्हा तिच्या मनात हेच येत होतं की, घरी जाऊन कसं फील करेन. कारण तिचे वडिल तिच्यासोबत नाहीत. वडिल ज्या खोलीत झोपायचे. ज्या खूर्चीवर बसून ते वंदनाशी बोलायचे आता ती खूर्ची रिकामी आहे. वंदनाने सांगितलं की, वडिल जेव्हा भेटायचे तेव्हा मला भारतासाठी पदक जिंकण्याविषयी सांगत असतं. वंदनाने तिच्या वडिलांची ती इच्छा पूर्ण करणार असल्याचं सांगितलं.