टोकियो - पहिल्यांदाच भारताची टेबल टेनिस खेळाडू टोकियो पॅरालिम्पिक 2020 मध्ये उपांत्यफेरीत पोहोचली आहे. भाविना पटेल असे महिला टेबल टेनिसमध्ये इतिहास रचणाऱ्या खेळाडूचे नाव आहे. 34 वर्षीय भाविना ही अहमदाबादची खेळाडू आहे.
भाविना पटेलने 2016 मध्ये टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेत्या बोरिसलावा पेरिच रांकोविचन यांना 3-0 ने हरवून उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. भाविनाने 19 मिनिटाच्या खेळात रांकोविचला 11-5,11-6, 11-7 ने पराभूत केले. पॅरालिम्पिकमध्ये महिला टेबल टेनिस स्पर्धेत उपांत्यफेरीत प्रवेश करणारी भाविना ही पहिली भारतीय खेळाडू आहे. उपांत्यफेरीत भाविनाचा सामना शनिवारी चीनच्या झांग मिआशी होणार आहे.
हेही वाचा-ENG vs IND 3rd Test :पहिल्या डावात इंग्लंडच्या ४३२ धावा; भारताविरोधात ३५४ धावांची मजबूत आघाडी