महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

नीरज, तू देशाचं स्वप्न पूर्ण केलं, धन्यवाद..! अभिनव बिंद्राचं ट्विट - undefined

भालाफेकपटू नीरज चोप्रा याने ऍथलेटिक्समध्ये देशाला पहिले ऑलिम्पिक स्वर्णपदक मिळून दिले आहे. त्याच्या चमकदार कामगिरीचे माजी नेमबाज व ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक विजेता अभिनव बिंद्रा याने कौतुक केले आहे.

niraj chopra success in olympic
niraj chopra success in olympic

By

Published : Aug 7, 2021, 8:58 PM IST

Updated : Aug 7, 2021, 10:13 PM IST

नवी दिल्ली - भालाफेकपटू नीरज चोप्रा याने अॅथलेटिक्समध्ये देशाला पहिले ऑलिम्पिक स्वर्णपदक मिळून दिले आहे. त्याच्या चमकदार कामगिरीचे माजी नेमबाज व ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक विजेता अभिनव बिंद्रा याने कौतुक केले आहे. नीरज तू देशाचे स्वप्न पूर्ण केले, धन्यवाद..! खूप अभिमान वाटत आहे, असे कौतुकाचे ट्विट अभिनव बिंद्रा याने केले आहे.

हेही वाचा -Tokyo Olympics: भारताचे राष्ट्रगीत ऐकताच नीरज चोप्रा झाला भावूक, व्हिडिओ होतोय व्हायरल

ट्विटबरोबरच अभिनवने नीरजला एक पत्र देखील लिहिले आहे. यात त्याने नीरजला ऑलिम्पिकमध्ये देशाला दुसरे सुवर्ण पदक मिळवून दिल्याबद्दल अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर, भालेफेक हे जरी भारतात जास्त फॉलो होणारे खेळ नसले, तरी तुझ्या ऐतिहासिक कामगिरीमुळे ते प्रकाशझोतात आले आहे, असे अभिनवने म्हंटले आहे.

नीरज हा ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्समध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे. त्याचबरोबर, 2008 नंतर, म्हणजेच 13 वर्षांनंतर भारतीय खेळाडूने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपद जिकण्याचा पराक्रम केला आहे. 2008 मध्ये नेमबाज अभिनव बिंद्रा याने वैयक्तिक गटात सुवर्ण पदक जिंकले होते. आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पदकाची संख्या 7 इतकी झाली झाली आहे. यात 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कास्य पदक आहेत.

हेही वाचा -नीरजच्या मन-मनगटात विश्वासाची समर्थ साथ; अंगावर रोमांच! मुख्यमंत्री, पवारांकडून गोल्डन बॉयवर कौतुकांचा वर्षाव

Last Updated : Aug 7, 2021, 10:13 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details