बर्मिघम - फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकणारी ऑस्ट्रेलियाच्या एश्ले बार्टी हिने आपल्या विजयाचा धडाका सुरुच ठेवला आहे. तिने 'नेचर वॅली क्लासिक' स्पर्धेत व्हीनस विल्यमसनचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. बार्टी हिने शुक्रवारी रात्री झालेल्या सामन्यात अमेरिकेच्या व्हीनसचा ६-४, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
महिला टेनिस : नेचर क्लासिक स्पर्धेत व्हीनस विल्यमसनचा बार्टीने केला पराभव - venus williams
फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकणारी ऑस्ट्रेलियाच्या एश्ले बार्टी हिने आपल्या विजयाचा धडाका सुरुच ठेवला आहे. तिने 'नेचर वॅली क्लासिक' स्पर्धेत व्हीनस विल्यमसनचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
एश्ले बार्टी
व्हीनस विरुध्दच्या सामन्यात बार्टीने आक्रमक खेळ करत पहिल्या सेटमध्ये लागोपाठ पाच गेम जिंकले. यानंतर दडपणात आलेल्या व्हीनसला तिने सामन्यात 'वापसी'च करु दिले नाही. दुसऱ्या सेटमध्येही बार्टीने आपला आक्रमणाचा धडाका कायम ठेवत, व्हीनसची दोन वेळा सर्विस तोडत विजय मिळवला. बार्टीचा उपांत्य सामना बाबरेरा स्ट्राइकोवा बरोबर होणार आहे.
एश्ले बार्टीने जर ही स्पर्धा जिंकल्यास ती जागतिक महिला टेनिसमध्ये प्रथम क्रमांकावर विराजमान होईल.