लंडन - रशियाचा स्टार टेनिसपटू डॉनिल मेदवेदेवने विम्बल्डन स्पर्धेची तिसरी फेरी गाठली. त्याने कार्लोस गार्फिया याचा ६-४, ६-१, ६-२ अशा सरळ सेटमध्ये एकतर्फा पराभव केला. दुसरीकडे महिला एकेरीत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेली एलिना स्वितोलिनाला पराभवाचा धक्का बसला.
विम्बल्डनच्या दुसऱ्या फेरीत युक्रेनची एलिना स्वितोलिनाचा सामना पोलंडच्या मागडा लिनेट हिच्याशी झाला. या सामन्यात मागडा हिने एलिनाचा ६-३, ६-४ असा धुव्वा उडवत एलिनाचे आव्हान संपुष्टात आणले. दरम्यान, डब्ल्यूटीए रॅकिंगच्या टॉप११ मधील आठ खेळाडू पराभव, माघार तसेच दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.
फ्रेंच ओपनची विजेती बारबरा क्रेजिकोव्हाने आंद्रिया पेटकोविचचा ७-५, ६-४ ने पराभव करत पुढील फेरी गाठली. बारबराचा हा सलग १४वा विजय आहे. ती फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन स्पर्धेत सलग सामने जिंकणाऱ्या सेरेना विल्यम्सचा विक्रम मोडण्याचा प्रयत्नात आहे.