महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

टेनिस चाहत्यांना धक्का!...यंदाची विम्बल्डन स्पर्धा रद्द - विम्बल्डन स्पर्धा 2020 रद्द न्यूज

ही स्पर्धा 28 जून ते 11 जुलै 2021 या कालावधीत होईल. 1945 नंतर प्रथमच ही स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. यापूर्वी दुसर्‍या महायुद्धावेळी ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती.

Wimbledon has been cancelled due to coronavirus outbreak
टेनिस चाहत्यांना धक्का!...यंदाची विम्बल्डन स्पर्धा रद्द

By

Published : Apr 1, 2020, 10:28 PM IST

Updated : Dec 26, 2020, 10:54 AM IST

लंडन -टेनिसमधील प्रतिष्ठेची मानली जाणारी विम्बल्डन स्पर्धा यंदा होणार नाही. कोरोनामुळे ही स्पर्धा अधिकृतपणे रद्द करण्यात आली आहे. ऑल इंग्लंड लॉन टेनिस क्लबने (एईएलटीसी) बुधवारी ही माहिती दिली.

आता ही स्पर्धा २८ जून ते ११ जुलै २०२१ या कालावधीत होईल. १९४५ नंतर प्रथमच ही स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. यापूर्वी दुसर्‍या महायुद्धावेळी ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती.

आम्हाला मोठ्या खिन्नतेने सांगायचे आहे की, ऑल इंग्लंड क्लब आणि व्यवस्थापन समितीने कोरोना व्हायरसमुळे यंदाची विम्बल्डन स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेशी संबंधित लोकांची जबाबदारी आम्ही जाणतो आणि त्यासाठी आम्ही रणनीती आखत आहोत, असे एईएलटीसीने एका निवेदनात म्हटले

Last Updated : Dec 26, 2020, 10:54 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details