हैदराबाद - विम्बल्डन चॅम्पियन सिमोना हालेपला कोरोनाची लागण झाली आहे. याची माहिती हालेपने स्वत: सोशल मीडियावरून दिली. तिने रिपोर्ट आल्यानंतर स्वत:ला आयसोलेट करून घेतले आहे. यातून लवकरच मी बाहेर पडेन, असा विश्वास तिने व्यक्त केला आहे.
सिमोना हालेपने याविषयी एक ट्विट केले आहे. मी तुम्हाला सांगू इच्छिते की, माझा कोविड-१९ चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे मी घरीच आयसोलेट झाली आहे. मला कोविडची लक्षणे जाणवत होती. यामुळे चाचणी करून घेतली. यात रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. पण मी यातून आता सावरत असून माझी प्रकृती ठीक आहे, असे हालेपने म्हटलं आहे.